Related Scheme
Description
नाव: - राजू माह- या पावरा
पत्ता: - मुक्काम. रोशमाल बुद्रुक पोस्ट. धडगाव तालुका. धडगाव जिल्हा. नंदुरबार 425414
विषय:- आयुष्मान कार्ड योजनेतून उपचार घेतला असून देखील अतिरिक्त 12 हजार रुपयांची मागणी केल्याबाबत...
गावाकडे माझ्या चेहऱ्यावर अपघाती इजा झाल्यामुळे दिनांक 9 मार्च 2026 रोजी नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात रुग्णालयाचे नाव स्मिथ क्रिटिकल ड्रामा आयसीयू सेंटर हॉस्पिटल नंदुरबार येथे दिनांक 9 मार्च 2026 रोजी ऍडमिट झालो संबंधित दवाखान्यात आयुष्यमान कार्ड वरून आम्ही उपचार घेतला आयुष्य मन कार्डावरील पॅकेज सुद्धा मंजूर झाला होता सहा ते सात दिवस सेवा दिल्यानंतर आम्हाला संबंधित खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले मात्र डिस्चार्ज करण्यावेळी सदर योजनेमध्ये तुम्हाला मेडिकलचे औषधी दिली जात नाही तुम्हाला मेडिकल औषधे साठी 12889 रुपये अतिरिक्त म्हणून द्यावा लागेल आणि बाहेरून मागवलेले डॉक्टरांचा फायली साठी दोन हजार रुपये द्यावे लागेल अशी मागणी करून बारा हजार रुपयाची औषधांची पावती देण्यात आली व अतिरिक्त दोन हजार रुपयांची पावती देण्यात आली नव्हती आम्ही याबाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची समाधानकारक माहिती देण्यात आली नाही सबंधित दिलेल्या रकमेची बिल पावत्या आमच्याकडे आहे.. तरी महादयांनी सदर गैरप्रकारच्या सखोल चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावे
धन्यवाद
Add new comment