Description
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झालेले आहे. मात्र, e-KYC करण्यासाठी गेल्यानंतर असे निदर्शनास आले की, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून योजनेच्या नोंदणी/माहिती भरताना माझा चुकीचा आधार क्रमांक व चुकीची माहिती बँक खात्याशी मॅप करण्यात आलेली आहे. माझ्या बँक खात्यामध्ये आधार क्रमांक व इतर आवश्यक माहिती योग्य आहे. परंतु शासकीय नोंदीमध्ये चुकीचा आधार क्रमांक असल्यामुळे माझी e-KYC प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि मला योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे संबंधित नोंदी तपासून चुकीचा आधार क्रमांक दुरुस्त करून योग्य आधार क्रमांक व बँक खाते माहितीचे mapping करावे आणि माझी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवून द्यावा, ही विनंती.
Add new comment