कॉर्पोरेट मित्र योजना

जमा करणार Pradeep on Mon, 20/07/2026 - 16:57
Narendra Modi PM of India
Scheme Open
Corporate Mitra scheme Image
हायलाइट्स
  • १२ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षणाचा समावेश आहे.
  • प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र आणि लागू नियमांनुसार विद्यावेतन दिले जाईल.
  • पात्र पदवीधर स्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • पात्र महिला उमेदवार आणि निर्दिष्ट प्रदेशांतील उमेदवारांना शुल्कामध्ये ५०% सवलत दिली जाईल.
Customer Care
  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी कोणतीही समर्पित हेल्पलाईन किंवा ईमेल पत्ता जारी केलेला नाही.
  • अधिक माहितीसाठी, उमेदवार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या
  • स्वयं प्लस पोर्टलला भेट देऊ शकते. ईमेल हेल्पडेस्क: [email protected]
योजनेचा सारांश
योजनेचे नावकॉर्पोरेट मित्र योजना
फायदे१२ महिन्यांचे प्रशिक्षण, प्रमाणपत्र, विद्यावेतन आणि शुल्कात सवलत.
लाभार्थीवयोमर्यादा असलेले भारतीय पदवीधर आणि पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी.
नोडल विभागकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए)
स्बक्रिप्शनयोजनेसंबंधित अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी येथे सदस्यता घ्या.
अर्ज करण्याची पद्धतस्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाईन

योजनेची ओळख: एक संक्षिप्त आढावा

कॉर्पोरेट मित्र योजना हा भारत सरकारने २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेला एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमइ) कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आहे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) सुरु केलेल्या या योजनेचा उद्देश तरुण पदवीधरांना कॉर्पोरेट मित्र म्हणून प्रक्षिशित करणे आहे, जे (एमएसएमइ) ना जीएसटी, लेखांकन, नियामक अनुपालन, वित्तीय व्यवस्थापन, खर्च लेखांकन, सचिवालयीन सेवा आणि इतर व्यवसाय-संबंधित कार्यांमध्ये मदत करू शकते. व्यावसायिक सहाय्य अधिक परवडणारे आणि सुलभ बनवून, ही योजना व्यवसाय करण्याची सुलभता सुधारण्याचा आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

कॉर्पोरेट मित्र योजनेद्वारा, निवडलेल्या उमेदवारांना १२ महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून जावे लागेल, ज्यामध्ये सहा महिन्यांचे ऑनलाईन शैक्षणिक शिक्षण (सुमारे १५० तास) आणि आयसीएआय, आयसीएसआय, व आयसीओएआय द्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक

कंपन्यांमध्ये सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण समाविष्ट असेल. शैक्षणिक अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना अधिकृत कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे देशभरात प्रशिक्षित एमएसएमई अनुपालन सुविधादाता म्हणून काम करू शकतीले.

इतर अनेक इंटर्नशिप किंवा कौशल्य विकास कार्यक्रमांप्रमाणे नसून, कॉर्पोरेट मित्र योजना हि कॉर्पोरेट व्हवहार मंत्रालयाचा एक स्वतंत्र उपक्रम आहे. ही योजना विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारच्या इंटर्नशिप किंवा कौशल्य विकास योजनांपासून स्वतंत्रपणे चालते आणि विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सहाय्य करू शकणारे प्रशिक्षित व्यावसायिक तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.

नोंदणी सुरु झाल्यावर, ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे पदवीधर आणि पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेे. अभ्यासक्रमाचे शुल्क ₹३,००० अधिक जीएसटी आहे, तर पात्र महिला उमेदवार आणि ईशान्य प्रदेश, हिमालयीन प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे व लक्षद्वीप येथील अर्जदारांना ५०% शुल्क सवलत मिळेल. आयसीएआय,आयसीएसआय, व आयसीओएआय च्या लागू नियमांनुसार, उमेदवारांना ऑन-द-जॉब प्रशिक्षण कालावधीत किमान विद्यावेतन देखील मिळेल.

या योजनेत सुरुवातीला प्रथम येवाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर २,००० उमेदवारांनी नोंदणी केली जाईल, ज्यामध्ये ईशान्य विभागातील २०० उमेदवारांचा समावेश असेल. स्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली तरी, नोंदणीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षणात स्वारस्य असलेले उमेदवार केंद्र सरकारच्या इतर उपक्रमांचाही विचार करू शकताते, जसे कि पीएम इंटर्नशिप योजना आणि डिजिटल इंडिया इंटर्नशिप योजना, ज्या विद्यार्थ्यांना आणि तरुण व्यावसायिकांना प्रत्य्क्ष कामाचा अनुभव आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देतात.

Corporate Mitra Scheme Details

योजनेचे फायदे

  • १२ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे
    • ६ महिन्यांचा ऑनलाईन शैक्षणिक शिक्षण (सुमारे १५० तास).
    • व्यावसायिक कंपन्यासोबत ६ महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण.
  • व्यवसाय, लेखांकन, कर आकारणी, जीएसटी, बँकिंग आणि संबंधित विषयांमध्ये सुमारे १५० तासांचे ऑनलाईन शिक्षण देते.
  • व्यावसायिक कंपन्यासोबतच्या प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव देते.
  • अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर 'कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र' प्रदान केले जाते.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि व्यावसायिक कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी सुधारते.
  • कामावरील प्रशिक्षणादरम्यान आयसीएआय, आयसीएसआय किंवा आयसीओएआय यांच्या लागू नियमांनुसार किमान विद्यावेतन दिले जाईल.
  • पात्र महिला आणि निर्दिष्ट प्रदेशांतील उमेदवारांना शुल्कामध्ये ५०% सवलत दिली जाईल.
  • उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदीमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी आहे.

कॉर्पोरेट मित्र काय करतो?

कॉर्पोरेट मित्र हा एक प्रशिक्षित व प्रमाणित व्यावसायिक सहाय्यक असतो, जो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्यांच्या व्यवसायातील अनुपालन आणि प्रशासकीय गरजा व्यवस्थापित करण्यास मदत करतो. कॉर्पोरेट मित्र योजना पूर्ण केल्यानंतर, प्रमाणित उमेदवार एमएसएमईंना परवडणारे व्यवसायिक सहाय्य देऊ शकते, ज्यामुळे व्यवसाय मालकांना वाढ आणि कामकाजावर लक्ष केंद्रित करता येते.

  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) नियामक आवश्यकतांचे पालन करण्यास साहाय्य करणे.
  • जीएसटी - संबंधित अनुपालन आणि दस्तऐवजीकरणासाठी साहाय्य प्रदान करणे.
  • लेखा नोंदी आणि आर्थिक विवरणपत्रे सांभाळण्यास मदत करणे.
  • व्यवसाय मालकांना मूलभूत आर्थिक मार्गदर्शन देणे.
  • खर्च लेखांकन आणि व्यवस्थापन लेखांकन कार्यांमध्ये साहाय्य करणे.
  • सचिवालयीन आणि कॉर्पोरेट प्रशासनाच्या आवश्यकतांमध्ये साहाय्य करणे.
  • उद्योगांना वैधानिक दाखल प्रक्रिया कर्तव्ये समजून घेण्यास आणि ती पूर्ण करण्यास मदत करणे.
  • व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी, विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसोबत (एमएसएमई) काम करणे.

पात्रतेच्या अटी

स्वयं प्लस पोर्टलवर नोंदणी करण्यापूर्वी अर्जदारांनी कॉर्पोरेट मित्र योजनेद्वारा विहित केलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यकता आहे. पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत:

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या तारखेला अर्जदाराचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
  • जे विद्यार्थी सध्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र त्यांना त्यांची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच देण्यात येईल.
  • नोंदणी जाहीर झाल्यावर अर्जदाराने अधिकृत स्वयं प्लस' पोर्टलद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांनी सहा महिन्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण (ऑन-द-जॉब ट्रेनिंग) यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे.

कॉर्पोरेट मित्र योजना अभ्यासक्रम शुल्क

उमेदवारांना स्वयं प्लस पोर्टलवर नोंदणीच्या वेळी विहित अभ्यासक्रम शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे आहे: टीव्ही आणि व्हिडीओ

विशिष्टशुल्क
नोंदणी शुल्क३,००० रु. + लागू जीएसटी
शुल्कामध्ये समाविष्ट आहेशैक्षणिक अभ्यासक्रम, पहिली मूल्यांकन चाचणी आणि कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र.
पूर्णमूल्यांकन शुल्क१,००० रु. + लागू जीएसटी (प्रत्येक पुढील प्रयत्नासाठी)
शुल्क सवलतपात्र उमेदारांना ५०% सवलत

५०% शुल्क सवलतीसाठी कोण पात्र आहे?

  • महिला उमेदवार.
  • ईशान्य राज्यांतील उमेदवार.
  • हिमालयीन प्रदेशातील उमेदवार (जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड).
  • अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवार.

आवश्यक कागदपत्रे

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने असे नमूद केले आहे की, पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि विहित अभ्यासक्रम शुल्क भरून स्वयं प्लस पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यावर कागदपत्रांची सविस्तर यादी दिली जाईल. योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, अर्जदारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही वैध ओळख पुरावा.
  • अलीकडील पासपोर्ट-आकाराचा फोटो.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र.
  • पदवीच्या अंतिम वर्षाचा पुरावा (सध्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी).
  • जन्मतारखेचा पुरावा.
  • भारतीय राष्ट्रीयत्व/रहिवासी असल्याचा पुरावा, आवश्यक असल्यास.
  • ५०% शुल्क सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवर्ग किंवा अधिवास प्रमाणपत्र (जिथे लागू असेल).
  • सक्रिय मोबाईल क्रमांक.
  • वैध ईमेल आयडी.
  • नोंदणी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा तपशील.

टीप: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अद्याप अंतिम कागदपत्र सूची प्रसिद्ध केलेली नाही. उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी स्वयं प्लस पोर्टल तसेच एमसीए, आयसीएआय, आयसीएसआय आणि आयसीओएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर अधिकृत नोंदणी अधिसूचनेची प्रतीक्षा करावी.

अर्ज करण्याची प्रक्रिया

कॉर्पोरेट मित्र योजनेची नोंदणी स्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाईन केली जाईल. नोंदणी सुरू झाल्यावर, पात्र उमेदवार खालील पायऱ्यांचे अनुसरण करून अर्ज करू शकते:

  • अधिकृत स्वयं प्लस पोर्टलला भेट द्या.
  • 'नोंदणी करा' (रजिस्टर) या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व इतर मूलभूत माहिती यांसारख्या आवश्यक तपशील देऊन तुमचे खाते तयार करा.
  • यशस्वी नोंदणीनंतर, तुम्ही पोर्टलवर आपोआप लॉग इन व्हाल.
  • कॉर्पोरेट मित्र योजना निवडा आणि ऑनलाईन अर्ज पूर्ण भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विहित नोंदणी शुल्क भरा.
  • अर्ज सादर करा आणि भविष्यातील संदर्भासाठी नोंदणीची पुष्टी डाउनलोड करा.
  • स्वयं प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेला सहा महिन्यांचा ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करा.
  • ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या पसंतीच्या ठिकाणानुसार आणि पात्रतेनुसार एक पात्र ऑन-द-जॉब प्रशिक्षण फार्म निवडा.
  • कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम, मूल्यांकन आणि सहा महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करा.

संबंधित लिंक्स

संपर्क माहिती

  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी कोणतीही समर्पित हेल्पलाईन किंवा ईमेल पत्ता जारी केलेला नाही.
  • अधिक माहितीसाठी, उमेदवार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या
  • स्वयं प्लस पोर्टलला भेट देऊ शकते. ईमेल हेल्पडेस्क: [email protected]

Frequently Asked Questions

कॉर्पोरेट मित्र योजना ही भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये घोषित केलेली एक योजना आहे. या योजनेचा उद्देश पदवीधरांना प्रमाणित कॉर्पोरेट मित्र म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अनुपालन, लेखांकन, जीएसटी, वित्तीय व्यवस्थापन आणि सचिवालयीन सेवांमध्ये सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे.

अर्ज सादर करण्याच्या तारखेला ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे भारतीय नागरिक तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

कॉर्पोरेट मित्र योजना १२ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करते. यामध्ये सहा महिन्यांचा ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावसायिक फर्ममध्ये सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण (ऑन-द-जॉब ट्रेनिंग) समाविष्ट आहे.

कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी नोंदणी शुल्क ₹३,००० अधिक लागू जीएसटी आहे. पात्र उमेदवारांना शुल्कामध्ये ५०% सवलतीचाही लाभ मिळू शकतो.

होय. ऑन-द-जॉब प्रशिक्षणासाठी निवडलेल्या उमेदवारांना आयसीएआय, आयसीएसआय किंवा आयसीओएआय यांच्या लागू नियमांनुसार संबंधित व्यावसायिक फर्मकडून किमान विद्यावेतन दिले जाईल.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, नोंदणीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. अर्ज स्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वीकारले जातील.

पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून अभ्यासक्रमाच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच त्यांना कॉर्पोरेट मित्र प्रमाणपत्र दिले जाईल.

कॉर्पोरेट मित्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर एकूण २,००० उमेदवारांची नोंदणी केली जाईल. यामध्ये ईशान्य प्रदेशातील २०० उमेदवारांचा समावेश असेल.

नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र उमेदवार अधिकृत स्वयं प्लस पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील.

होय. कॉर्पोरेट मित्र योजना ही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा स्वतंत्र उपक्रम आहे. ही योजना केंद्र व राज्य सरकारांच्या इतर इंटर्नशिप किंवा कौशल्य विकास कार्यक्रमांपासून स्वतंत्रपणे राबवली जाते.

Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:

Feel free to click on the link and join the discussion!

This forum is a great place to:

  • Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
  • Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
  • Connect with others: Engage with the community and learn from others.

I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.