नव्या योजना

author
जमा करणार shahrukh on Mon, 22/12/2025 - 16:56
केंद्र सरकार CM
Scheme Open
Details of NAVYA Scheme
Youtube Video
हायलाइट्स
  • अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. 
योजनेचा आढावा
योजनेचे नावनव्या योजना.
सुरु झाल्याचे वर्ष२४-०६-२०२५
फायदेअल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.
लाभार्थी१६ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली.
नोडल विभागमहिला आणि बाल विकास मंत्रालयाचा.
सब्स्क्रिप्शनसदस्यता योजनेबाबत अपडेट मिळविण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धतपंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्रामार्फत.
नव्या योजनेचे फायदे

योजनेचा परिचय : थोडक्यात आढावा

  • केंद्र सरकारने २४-०६-२०२५ रोजी "नव्या योजना" नावाची एक सर्वात प्रमुख योजना सुरु केली आहेत.
  • उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हात श्री जयंत चौधरी आणि श्रीमती सावित्री ठाकूर यांनी संयुक्तपणे हि योजना सुरु केली होती.
  • नव्या चे पूर्ण रूप "तरुण किशोरवयीन मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे आकांशा जोपासणे" असे आहेत.
  • सरकारच्या हि योजना सुरु करण्यामागील मुख्य उद्देश्य म्हणजे तरुण किशोरवयीन मुलींना इतक्या लहान वयात कौशल्य प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून स्वतःसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतील.
  • महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय संयुक्तपणे नव्या योजना राबवतील.
  • दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि सध्या १६ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व पात्र विद्यार्थींना मोफत व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
  • सध्या नव्या योजना ९ राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आली आहेत, ती म्हणजे :- हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक.
  • लाभार्थी मुलींना ग्राफिक डिझायनिंग, व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट, ड्रोनअसेम्ब्ली एक्सपर्ट, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन एक्सपर्ट, स्मार्टफोन टेक्निशियन या विषयांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचे दरवाजे उघडता येईल.
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्रात मुलींना हे अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.
  • निवडलेला तरुणींना ७ तासांचे पूरक प्रशिक्षण मॉड्युल देखील मिळेल ज्यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहेत :-
    • आंतरवैयक्तिक कौशल्ये - स्वच्छता, स्व - सादरीकरण आणि संघर्ष व्यवस्थापन.
    • संवाद कौशल्ये - सक्रिय ऐकणे आणि प्रभावी संवाद.
    • कामाच्या ठिकाणी सुरक्षितता - POSH कायदा आणि कायद्यांचे ज्ञान.
    • आर्थिक साक्षरता - कमाई, बजेट आणि मूलभूत आर्थिक संकल्पना.
  • जवळच्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्राला भेट द्या आणि नव्या योजनेद्वारा कौशल्य प्रशिक्षणासाठी अर्ज करावा.
नव्या योजनेचे लाभ

योजनेचे फायदे

  • सरकार तरुण मुलींना अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण देईल.
  • पात्र मुलींना कौशल्य प्रशिक्षण देईल :-
    • ग्राफिक डिझायनिंग
    • ड्रोन असेम्बलिंग
    • स्मार्टफोन दुरुस्ती
    • व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट
    • सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन एक्सपर्ट
  • ७ तासांचे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण मॉड्युल देखील प्रदान करण्यात येईल.

पात्रतेची आवश्यकता

  • तरुण किशोरवयीन मुली पात्र आहे.
  • मुलीचे वय १६ ते १८ वर्षे असावे.
  • १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  • मुलींचे आधार कार्ड.
  • दहावीचा गुणपत्रिका.

अर्ज करण्याचे टप्पे

  • नव्या योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्रामार्फत राबविली जाईल.
  • लाभार्थी विद्यार्थिनीला त्यांच्या जवळच्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्राला भेट देऊन नव्या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • केंद्रात उपस्थित असलेले अधिकारी मुली लाभार्थीला नव्या योजनेद्वारे तिच्या पसंतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात नोंदणी करतील.
  • मुली लाभार्थी पीएमकेव्हीवाय केंद्रात व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातुन जाईल.
  • प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर मुलीला प्रमाणपत्र देखील दिले जाईल ज्यामुळे तिला चांगली रोजगार संधी मिळेल.
नव्या योजनेची माहिती

संबंधित लिंक्स

संपर्क माहिती

Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:

Feel free to click on the link and join the discussion!

This forum is a great place to:

  • Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
  • Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
  • Connect with others: Engage with the community and learn from others.

I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.

Comments

Science

Your Name
Laxmi kumari
प्रतिक्रिया

Mujhe bhi apne pairo pe khada hona hai isliye mai chahti hun ki mai bhi is yojna se judu aur apne aap ko saksham banau

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.