महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

जमा करणार Pradeep on Tue, 28/07/2026 - 09:37
Devendra Fadnavis
Scheme Open
 Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana
हायलाइट्स
  • पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
  • नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत संपूर्ण प्रोत्साहन लाभ मिळेल.
  • ज्या शेतकऱ्यांची पात्र थकीत कर्जाची रक्कम ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे, ते वन टाइम सेटलमेंट (OTS) सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
Customer Care
  • महाराष्ट्र कृषी विभाग क्रमांक:- ०२० २६१२३६४८.
  • महाराष्ट्र कृषी विभाग ई-मेल:- [email protected].
योजनेचा सारांश
योजनेचे नावमहाराष्ट्र पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना.
सुरु झाल्याचे वर्ष२०२६.
फायदेशेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची लाभ सुविधा.
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी.
सब्स्क्रिप्शनयोजनेसंबंधी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी येथे सदस्यता घ्या.
अर्ज करण्याची पद्धतआधार बायोमेट्रिक ई-केवायसीद्वारे
Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana Details

योजनेचा परिचय : थोडक्यात आढावा

महाराष्ट्र सरकारने ६ मार्च २०२६ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्प २०२६-२७ दरम्यान, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी कर्णाच्या कारणाने एक प्रमुख महाराष्ट्र  शेतकरी कर्जमाफी योजना म्हणून पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ ची घोषणा केली. अर्थसंकल्पीय घोषणेनंतर, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २ जून २०२६ या दिवसी योजनेला मंजुरी दिली, त्यानंतर सरकारने पात्रता निकष, लाभ आणि अंमलबजावणी प्रकियेची रूपरेषा देणारे एक सविस्तर ठराव जारी केला. या महाराष्ट्र कर्जमाफी योजनेद्वारे, राज्य सरकार थकीत कृषी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देऊ इच्छिते आणि त्यांची दीर्घकालीन आर्थिक स्थिरता सुधारू इच्छिते.

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा, पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी भेटू शकते. या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित केलेल्या पात्र अल्प-मुदतीच्या पीक कर्जाचा समावेश आहे, जी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत होती आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड केली गेली नव्हती. सरकारने काही पुनर्रचित आणि पुन्हा पुनर्रचित कृषी कर्जाचाही यात समावेश केला आहे, जेणेकरून अधिक शेतकऱ्यांना या महाराष्ट्र कर्जमाफी योजनेद्वारे लाभ घेता येईल.

पीक कर्जमाफीचा लाभ देण्याबरोबरच, महाराष्ट्र शासनाने नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन लाभासाठीची पात्रता अटी अलीकडेच शिथिल केल्या आहेत. यापूर्वी प्रोत्साहन लाभावर असलेली ₹50,000 ची कमाल मर्यादा रद्द करण्यात आली असून, सुधारित शासकीय निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. याशिवाय, काही परतफेडीच्या अटीही शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सुमारे 9.3 लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभाचा फायदा होणार असून, जवळपास 23 लाख अतिरिक्त शेतकरीही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. कर्जमाफीच्या मर्यादेपेक्षा अधिक पात्र थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (OTS) ची सुविधा या योजनेअंतर्गत पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार आहे.

महाराष्ट्र कर्जमाफी योजना २०२६ ची अंमलबजावणी सहकार विभागामार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी प्लॅटफार्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्रता प्रत्येक शेतकऱ्यानुसार निश्चित केली जाईल आणि २ लाख रुपयांच्या पीक कर्जमाफी योजनेसाठीच्या पात्रतेवर जमिनीच्या मालकी हक्काच्या आकाराचा परिणाम होणार नाही.

कृषी विभाग आणि सहकार विभाग संयुक्तपणे योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा तात्काळ कर्जमाफी देण्यासोबतच, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे वारंवार होणारे कर्जबाजारीपण रोखणे आणि कृषी पतप्रणाली मजबूत करणारे या उद्देशाने दीर्घकालीन सुधारणांचीही घोषणा केली आहे.

या महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेव्यतिरिक्त, पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक आर्थिक सहाय्य मिळत राहू शकते. एकत्रितपणे, या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक मजबूत आर्थिक सुरक्षाआणि शाश्वत आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यासही सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत, त्यांनी पात्र कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा होण्यापूर्वी अधिकृत केंद्रावर जाऊन आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana revised Eligibility

योजनेचे लाभ

  • पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ₹2,00,000 पर्यंतच्या पीक कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
  • कर्जमाफीमध्ये पात्र थकीत पीक कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम समाविष्ट आहे.
  • नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत संपूर्ण प्रोत्साहन लाभ मिळेल.
  • शिथिल करण्यात आलेल्या पात्रता निकषांमुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे 9.3 लाख शेतकऱ्यांना सुधारित प्रोत्साहन लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
  • पात्रता निकषांमधील शिथिलीकरणामुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक पीक कर्ज अधिक सुलभ होईल आणि अधिक आर्थिक दिलासा मिळेल.
  • ज्या शेतकऱ्यांची पात्र थकीत कर्जाची रक्कम ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे, ते वन टाइम सेटलमेंट (OTS) सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करून त्यांची आर्थिक स्थिरता मजबूत करणे हा आहे.

२ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी एकरकमी परतफेड (ओ टी एस)

महाराष्ट्र सरकारने, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा निर्धारित केलेल्या कर्जमाफीच्या मर्यादेपेक्षा जास्त थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड (ओ टी एस) सुविधा सुरु करण्यात आली आहेत.

  • जर एकूण पात्र थकीत पीक कर्ज २ लाख रुपयांपर्यंत असेल, तर शेतकरी योजनेच्या तरतुदींनुसार कर्जमाफीचा लाभ घेऊ शकते.
  • जर थकीत पात्र कर्जाची रक्कम २ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर शेतकऱ्याने प्रथम २ लाख रुपयांपेक्षा जास्त असेलली रक्कम संबंधित बँकेत जमा करणे गरजेचा आहेत.
  • थकीत रकमेची अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर, शेतकऱ्याला एकरकमी परतफेड (ओ टी एस) योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची लाभ मिळू शकतात.
  • या तरतूद योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या पात्र पुनर्रचित किंवा पुन्हा पुनर्रचित पीक कर्जानाही लागू होते.
  • महाराष्ट्र सरकारने पात्र शेतकऱ्यांना, विहित मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या रकमेतील आपला वाट जमा करून एकरकमी परतफेड योजनेचा (ओ टी एस) लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुद्दत देण्यात आली आहेत.

पात्रता आवश्यकता

शेतकऱ्यांनी पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा २०२६ विहित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणे गरजेचा आहेत. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभांसाठी पात्रतेच्या अटी  खाली दिलेल्या आहेत.

 कर्जमाफीच्या लाभांसाठी

  • हि लाभ वैयक्तिक शेतकऱ्याच्या आधारावर देण्यात येईल.
  • अल्प मुदतीचे पीक कर्ज ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले असावे.
  • ३० सप्टेंबर २०२५ या रोजी कर्ज थकीत राहिले असावे.
  • ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत रकमेची परतफेड झालेली नसावी.
  • एक किंवा अधिक पात्र कर्ज खाती असलेले शेतकरी योजनेअंतर्गत विहित केलेल्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून लाभ मिळवू शकते.
  • शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहेत.
  • ॲग्रीस्टॅक शेतकरी  नोंदणी प्लॅटफार्मवर नोंदणी करणे अनिवार्य आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभ

  • नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन लाभाच्या पात्रता अटी शिथिल केल्या आहेत.
  • शेतकऱ्याने सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे.
  • प्रोत्साहन लाभावरील पूर्वीची ₹50,000 ची कमाल मर्यादा रद्द करण्यात आली आहे.
  • संबंधित पीक कर्जाची परतफेड पुढील वर्षाच्या 30 जूनपर्यंत किंवा कर्ज देणाऱ्या बँकेने निर्धारित केलेल्या परतफेडीच्या कालावधीत केलेली असावी.
  • नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाईल.
  • प्रोत्साहन लाभाची रक्कम निश्चित करताना शासनाने अधिसूचित केलेले सुधारित पात्रता निकष लागू राहतील.
  • आधार प्रमाणीकरण आणि Agristack Farmer Registry Platform वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

कोण पात्र नाही?

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांना समावेश असला तरी, सरकारने काही विशिष्ट प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळण्यापासून वगळले आहेत. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा, खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गात येणारे अर्जदार लाभांसाठी पात्र असणार नाही.

  • विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य.
  • जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य.
  • केंद्र किंवा  राज्य सरकारी कर्मचारी ज्यांचे एकूण मासिक वेतन २५,००० रु. पेक्षा जास्त आहेत.
  • राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्थांमधील कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन २५,००० रु. पेक्षा जास्त आहेत.
  • शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्न स्रोतांमधून आयकर भरणारे व्यक्ती.
  • माजी सैनिक वगळता २५,००० रु. पेक्षा जास्त मासिक निवृत्तीवेतन मिळवणारे निवृत्तीवेतनधारक.
  • सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी बँका, दूध संघ आणि इतर निर्दिष्ट सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचा मासिक पगार २५,००० रु. पेक्षा जास्त आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • आधारशी जोडलेला मोबाईल  क्रमांक.
  • ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी  क्रमांक.
  • पीक कर्ज खात्याचा तपशील.
  • बँक खात्याचा तपशील.
  • पडताळणी दरम्यान आवश्यक असल्यास, जमिनीच्या नोंदीचा तपशील.
  • अंमलबजावणी प्राधिकरणाने विहित केलेली कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे.

महाराष्ट्र ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणीवर नोंदणी कशी करावी?

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी प्लॅटफार्मवर नोंदणी करणे अनिवार्य  आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, ते आपला शेतकरी नोंदणी आयडी तयार करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करू शकते.

  • अधिकृत महाराष्ट्र कृषी शेतकरी नोंदणी पोर्टलला भेट द्या.
  • शेतकरी म्हणून नोंदणी करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि आधार - याआधारित प्रमाणीकरण पूर्ण करा.
  • आधारशी जोडलेला तुमचा मोबाईल क्रमांक द्या आणि ओ टी पी द्वारे त्याची पडताळणी करा.
  • पोर्टलवर दर्शवल्याप्रमाणे नाव, पत्ता आणि इतर माहिती यांसारखे आवश्यक वैयक्तित तपशील भरा.
  • उपलब्ध असलेल्या जमिनीच्या नोंदणीमधून तुमच्या शेतजमिनीचा तपशील निवडा  आणि त्याची पडताळणी करा.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा  आणि नोंदणी अर्ज सादर करा.
  • यशस्वी पडताळणीनंतर, एक अद्वितीय शेतकरी नोंदणी आयडी (एफ आर आय डी) तयार केले जाईल.
  • हा शेतकरी नोंदणी आयडीसुरक्षित ठेवा, कारण पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणि इतर  सरकारी योजनेद्वारे लाभांसाठी अर्ज करताना त्याची आवश्यकता भासू शकते.
  • नोंदणी करताना तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास, मदतीसाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिसेस सेंटर (सी एस सी), सेतू सुविधा  केंद्र किंवा नियुक्त सरकारी सेवा केंद्राला भेट देऊ शकते.

लाभार्थी यादी कशी तपासावी?

महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत, ते कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करण्यास पात्र ठरतील. सध्या कर्जमुक्ती पोर्टलवर लाभार्थी यादी सार्वजनिकरीत्या शोधण्यासाठी उपलब्ध नाही.

  • आपण पात्र पीक कर्ज घेतलेल्या संबंधित बँक शाखेला भेट द्या.
  • आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातही लाभार्थी यादी तपासता येईल.
  • लागू असल्यास, संबंधित सहकारी संस्थेमध्येही लाभार्थी यादी प्रदर्शित करण्यात आली आहे.
  • आपले नाव लाभार्थी यादीत असल्यास, आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (CSC/VLE) किंवा अधिकृत बँक शाखेला भेट द्या.

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत, त्यांनी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र (CSC/VLE), ग्रामपंचायत कार्यालय किंवा आधार बायोमेट्रिक ई-केवायसी सुविधा उपलब्ध असलेल्या संबंधित बँक शाखेला भेट द्या.
  • अधिकृत ऑपरेटरला आपला आधार क्रमांक किंवा उपलब्ध असल्यास विशिष्ट क्रमांक द्या, जेणेकरून तो अधिकृत कर्जमुक्ती पोर्टलवर आपली लाभार्थी नोंद शोधू शकेल.
  • आपली नोंद मिळाल्यानंतर पोर्टलवर दर्शविलेली लाभार्थी माहिती, आधार तपशील, पीक कर्ज खात्याचा तपशील आणि पात्र कर्जमाफीची रक्कम काळजीपूर्वक तपासा.
  • कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास, त्वरित अधिकृत ऑपरेटरला कळवा. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी ऑपरेटर पोर्टलद्वारे हरकत नोंदवू शकतो.
  • आपली संमती द्या आणि अधिकृत केंद्रावर उपलब्ध बायोमेट्रिक उपकरणाद्वारे आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करा.
  • आधार प्रमाणीकरण आणि पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, पात्र कर्जमाफीची रक्कम थेट आपल्या पात्र पीक कर्ज खात्यात जमा केली जाईल.

योजनेअंतर्गत समाविष्ट बँका

  • राष्ट्रीयकृत बँका.
  • खाजगी क्षेत्रातील बँका.
  • प्रादेशिक ग्रामीण बँका.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.
  • स्वतःच्या निधीतून कर्ज देणाऱ्या प्राथमिक कृषी पतसंस्था.

संबंधित लिंक्स

संपर्क माहिती

  • महाराष्ट्र कृषी विभाग क्रमांक:- ०२० २६१२३६४८.
  • महाराष्ट्र कृषी विभाग ई-मेल:- [email protected].

Frequently Asked Questions

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जावर जास्तीत जास्त ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.

ज्या शेतकऱ्यांचे पात्र पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड झालेली नव्हती, असे शेतकरी योजनेतील सर्व अटी पूर्ण केल्यास कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरू शकतात.

या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेली पात्र अल्पमुदतीची पीक कर्जे समाविष्ट आहेत.

होय. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी मंचावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

होय. ज्या शेतकऱ्यांची पात्र थकीत कर्जाची रक्कम ₹२ लाखांपेक्षा जास्त आहे, ते निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम भरल्यानंतर एकरकमी तडजोड (ओटीएस) सुविधेद्वारे योजनेचा लाभ घेऊ शकतात.

नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ दिला जाईल.

नाही. या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेणारे शेतकरी ₹५०,००० च्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र राहणार नाहीत.

होय. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभावरील पूर्वीची ₹50,000 ची कमाल मर्यादा महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे. सुधारित निर्णयानुसार सुमारे 9.3 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण प्रोत्साहन लाभ मिळण्याची अपेक्षा असून, जवळपास 23 लाख अतिरिक्त शेतकरी या लाभासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत नाव आल्यानंतरच शेतकऱ्यांनी आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करावी. पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.

पात्र लाभार्थी योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित बँक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करू शकतात.

आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि लाभार्थ्याच्या तपशीलांची पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या पात्र पीक कर्ज खात्यात जमा केली जाईल.

Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:

Feel free to click on the link and join the discussion!

This forum is a great place to:

  • Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
  • Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
  • Connect with others: Engage with the community and learn from others.

I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.

Comments

Pik karj mapi

Your Name
Ishwar bhanudas darade
प्रतिक्रिया

Jai Ho

Ahilyabai karja Mukti Yojana

Your Name
Mhaisaji bhjuTuppekar
प्रतिक्रिया

Maisaji tupekar

In reply to by [email protected] (verified= न पडताळणी केलेला)

जर कर्जदार शेतकऱ्यांची मयत झाली असेल तर केवायसी प्रोसेस

Your Name
gopal pachpor
प्रतिक्रिया

महोदय ,
जर कर्जदार मयत झाले असेल तर बायोमेट्रिक केवायसी प्रक्रिया संबंधी माहिती द्यावी

In reply to by [email protected] (verified= न पडताळणी केलेला)

Karjmafi

Your Name
Kishanrao jivanrao Dhond
प्रतिक्रिया

Karjmafi milne babat

Karj mafi

Your Name
Mangesh Tidke
प्रतिक्रिया

Mi

Karjmafi

Your Name
Bapurav shripati pagale
प्रतिक्रिया

No

Karj mafi

Your Name
Pandurang ragunath Durpade
प्रतिक्रिया

Hoya

In reply to by gajanandurpade…

Karj mafi

Your Name
Laxman Sharanappa Nimbal
प्रतिक्रिया

Aadhar number chukiche aahe

Kaj

Your Name
Aniket Zade
प्रतिक्रिया

Kaj mafhi

कर्ज माफी यादी

Your Name
Aniket Sanjay Charhate
प्रतिक्रिया

कर्ज माफी यादी

In reply to by aniketcharhate…

Karji maafi yaadi

Your Name
Dnyaneshwar Shravan Thakare
प्रतिक्रिया

Is there my name in the list ?

In reply to by aniketcharhate…

karj mafi

Your Name
Avinash Kakade
प्रतिक्रिया

karj maf jale ka

In reply to by aniketcharhate…

Karj mapi

Your Name
Lilabai prabhu rathod
प्रतिक्रिया

Ahilyabai holkar karj mapi

In reply to by aniketcharhate…

Lone

Your Name
Machindra Janardhan Nimsakhre
प्रतिक्रिया

List

Karj mafi

Your Name
Bhaskar ramkuruna devkar
प्रतिक्रिया

Karj mafi yadi

कर्जमाफी योजना

Your Name
Dattatry वामन gavali
प्रतिक्रिया

कर्जमाफी योजना

Karj mafi

Your Name
Vaman arjun Dhapse
प्रतिक्रिया

Karj mafi

loan amount Rs. 240000/-

Your Name
HANMANT RAMCHANDRA SURWASE
प्रतिक्रिया

sir. croup loan amount rs .240000/- for ldcc bank latur give benifet for this schime

soybean

Your Name
Sunil Kute
प्रतिक्रिया

State Maharashtra jila Buldhana taluka chikhali karj mafi list Buldhana jila listli

in our mobile number and WhatsApp group

कर्जमाफी यादी

प्रतिक्रिया

कर्जमाफी यादी

Karj mafi yadi

Your Name
Manik thorave
प्रतिक्रिया

Karj mafi yadi

Karj mafi

Your Name
Gajanan Balkrishna Tayde
प्रतिक्रिया

Karj mafi

कर्जमाफी यादी

Your Name
Sagar Nebade
प्रतिक्रिया

जिल्हा संभाजीनगर तालुका सोयगाव ढाबा

Amravati jilha karj mafi list

Your Name
Namdevrao devidas Gawande
प्रतिक्रिया

Karj mafi 2026

1119

Your Name
9665550417
प्रतिक्रिया

Rtu

प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये भेटले नाही

Your Name
Ritesh Govardhan Choudhary
प्रतिक्रिया

रा अडगाव ता मोशी जिल्हा अमरावती

Karj mafi yadi

Your Name
Mahebubsab davalsab nurbash
प्रतिक्रिया

Yah vyakti sanavad ki nahin

Karj mafi

Your Name
Dnyandeo dattatre kolse
प्रतिक्रिया

Karj mafi

Karj mafi yadi Kashi payach

प्रतिक्रिया

Karj mafi yadi Kashi payach

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Karj mahit

Your Name
Aaju Landge
प्रतिक्रिया

Ahilya Bai holkar karj maphi

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Pdf karjmafi

Your Name
Vikram Hipparkar
प्रतिक्रिया

Pdf bhetali nahi ajun

Croploan

Your Name
Chaturabai Dharma Gadhekar
प्रतिक्रिया

Karzmazuri 2026

karja mafi yadi

Your Name
Nanabhau dharma wankhede
प्रतिक्रिया

karja mafi yadi

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 – Aadh

Your Name
Ahemad papakha pathan
प्रतिक्रिया

माझ्या वडिलांच्या नावावर शेती असून त्यांच्या नावावर स्वतंत्र बँक खाते आहे आणि त्याच खात्यावर पीक कर्ज घेतलेले आहे. तसेच Farmer ID देखील माझ्या वडिलांच्या नावावर आहे.मात्र कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये माझ्या आईचा आधार क्रमांक दिसत असल्यामुळे KYC पूर्ण होत नाही.“कृपया सदर प्रकरणाची पडताळणी करून लाभार्थी म्हणून माझ्या वडिलांचा योग्य आधार क्रमांक नोंदवून दुरुस्त करावा, जेणेकरून आम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल.”

कर्जमाफी

Your Name
Jadhav Pavankumar vithalrao
प्रतिक्रिया

कर्जमाफी यादीत नाव आलेले नाही अद्याप

कर्जदार व्यक्ती मयत असल्यास त्यासाठी पर्याय पोर्टल उपलब्ध करावा

Your Name
विशाल गुलाबराव भिसे
प्रतिक्रिया

मयत कर्जदार व्यक्ती च्या वारसांना खूप अडचणी येत आहेत बँक व इतर कार्यालया मध्ये कोणीही माहिती याबाबत देत नाही आहे. कृपया यावर उपाययोजना काढाव्या

Karja mafi

Your Name
Prashant Dharma rathod
प्रतिक्रिया

Karja mafi

आधार क्रमांक चुकीचा आहे

Your Name
Pravin Ashok Navghare
प्रतिक्रिया

बँकेत अपडेट करून ही आधार प्रमाणीकरण होत नाही y

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.